| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा].
संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
- लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.
- लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.
- प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.
- लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा
|
तिखोल हे पारनेर तालुक्यातले निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक लहान गाव आहे. गावातील ९९ % लोक हे शेतकरी आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुका हा थोडाफार तसा डोंगराळ असून दुष्काळी तालुका आहे.
तिखोल गावाच्या पूर्वेला धोत्रे व हिवरे कोरडा ही गावे, दक्षिणेला खानूर पठार व काकानेवादी ही गावे आणि पश्चिमेला टाकळी ढोकेश्वर हे गाव आहे.तिखोळ हे पारनेरपासून १७ किमी अंतरावर असून कल्याण- विशाखापट्टण महामार्गापासून फक्त ४ किमी अंतरावर आहे. या गावाला गावापासून ५ कि.मी. अंतरावरच्या खानूर पठार या गावामार्गेपण जाता येते.
तिखोल गावात काळू नदी आहे. गावाला तीन बाजूने डोंगराने वेढलेले आहे. तीन बाजूनी डोंगर आणि मध्ये खोल दरीत वसलेले गाव, यामुळेच या गावाला तिखोल हे नाव पडले. तिखोल गावामध्ये ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग आहेत. गावाचा कारभार सरपंच पाहतात.
गावामध्ये भव्य दिव्य असे मुत्ताबाई मातेचे मंदिर आहे. खूप दूरवरून लोक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. याच गावामध्ये हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, खंडेश्वर, लाम्हणबाबा, हरिहरेश्वर यांचीही देवळे आहेत. गावातये सरकारी हॉस्पिटल, तालीम, वाचनालय इत्यादी सुखसुविधा आहेत. सर्व धर्माचे लोक गावामध्ये सुखासमाधानाने राहतात.हो