ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार (इंग्रजी: Dragon Palace Buddhist temple) हा महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामठी येथील बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. हा विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेला आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे.[१][२] ड्रॅगन पॅलेस मंदिर हे ‘लोटस टेंपल’ (कमळ मंदिर/कमळ विहार) नावाने ओळखले जाते. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विहारात सप्टेंबर २०१७ मध्ये भेट देऊन येथे येथिल भव्य अशा विपश्यना केंद्राचे उद्घाटन केले आहे.