डेव्हिड मायकेल हॅसेलहॉफ (१७ जुलै, १९५२:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका - ), [१] तथा " द हॉफ ", [२] हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक आहे. दूरचित्रवाणीवर सर्वाधिक दिसलेला माणूस असा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याच्या नावावर आहे. [३] हॅसलहॉफने आपल्या कारकीर्दीची सुरुवात द यंग अँड द रेस्टलेस या दूरचित्रवाणी मालिकेत (१९७५-१९८२)) मध्ये डॉ. स्नॅपर फॉस्टरच्या भूमिकेने केली. यानंतर त्याला नाइट रायडरमधील (१९८२-८६) मायकेल नाइट आणि बेवॉच (१९८९-२०००) मधील एलए काउंटी जीवनरक्षक मिच बुकॅनन या भूमिकांद्वारे मोठे यश मिळाले.