डेव्हिड रॉबर्ट जोन्स तथा डेव्हिड बोवी (८ जानेवारी, इ.स. १९४७:लंडन:इंग्लंड - १० जानेवारी, इ.स. २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा इंग्लिश गीतकार, संगीतकार, गायक, चित्रकार आणि अभिनेता होता. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला बोवी रॉक संगीतातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातो.
कौटुंबिक माहिती
बोवीचा जन्म दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात झाला. याची आई मार्गारेट मेर पेगी बर्न्स-जोन्स ही वेट्रेस[मराठी शब्द सुचवा] होती तर वडील हेवूड स्टेन्टन जॉन जोन्स हे बार्नार्डोझ या मुलांसाठीच्या धर्मादाय संस्थेत प्रसिद्धी अधिकारी होते.
मृत्यू
बोवीने आपल्या ६९व्या वाढदिवशी ब्लॅकस्टार नावाचा नवीन संगीतसंच प्रकाशित केला. दोन दिवसांनी त्याचा काळजाच्या कर्करोगाने मृत्यू झाला.[१][२]
संदर्भ आणि नोंदी