| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
डी.पी. भोसले कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय असून ते कोरेगाव जि. सातारा येथे आहे. या महाविद्यालयाची स्थापना १९६८ मध्ये झाली. कोरेगाव पासून रहिमतपूर रोडवर २ कि. मी. अंतरावर हे महाविद्यालय आहे.
वरिष्ठ महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., बी.व्होक., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत तर कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डॉ. विजयसिंह सावंत हे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या महाविद्यालयाला २०१७ साली एनएएसी, बंगळूर यांचेकडून 'अ' दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाचे आयएसओ प्रमाणीकरण ही झालेले आहे.
बी. ए. पदवीसाठी मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास हे वैकल्पिक विषय उपलब्ध आहेत. बी. कॉम. पदवीसाठी Advanced Accountancy, Advanced Banking, तर बी. एस्सी. पदवीसाठी Chemistry, Physics, Maths,, Zoology, Botony हे विषय उपलब्ध आहेत.
येथे एम.ए. साठी मराठी, इंग्लिश, अर्थशास्त्र, एम.कॉम. साठी Advanced Accountancy, Advanced Banking, तर एम.एस्सी. साठी Chemistry आणि Geography हे विषय उपलब्ध आहेत.
भव्य क्रीडांगण, प्रशस्त इमारती, दर्जेदार शिक्षण, भरपूर व दुर्मिळ ग्रंथसंपदा असणारे ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, कॅन्टीन, इ. परिपूर्ण सोयी असणारे हे महाविद्यालय आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, संशोधन, शैक्षणिक व रोजगार संधी अश्या विविध क्षेत्रात महाविद्यालयाने गरुडभरारी घेतलेली आहे.