थॉमस लिओटॉमक्लॅन्सी, जुनियर (१२ एप्रिल, १९४७ - १ ऑक्टोबर, २०१३) हे अमेरिकन लेखक होते. यांनी शीतयुद्ध काळातील कथानक असलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या लिखाणात हेरगिरी आणि युद्धशास्त्राचे विस्तृत लिखाण आहे. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी १७ बेस्ट सेलर यादीत आल्या. त्यांच्या पुस्तकांच्या १० कोटींपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.[१]