जोसेफ लुई लाग्रांज (जानेवारी २५, १७३६:तुरिन, इटली - एप्रिल १०, १८१३:पॅरिस, फ्रांस) हा गणितज्ञ व गणितीय भौतिकशास्त्रज्ञ होता.
याचेच मूळ नाव ज्युसेप्पे लोडोव्हिको लाग्रांजिया असे होते.
अतिशय तल्लख असलेला लाग्रांज वयाच्या विसाव्या वर्षी तुरिनच्या आर्टिलरी स्कूल मध्ये प्राध्यापकपदावर पोचला. लियोनार्ड ऑयलर व ड'अलॅम्बर्टच्या भलावणीवरून त्याला बर्लिनच्या प्रशियन विज्ञान अकादमीचा निदेशक म्हणून नेमण्यात आला. या पदावर वीस वर्षे राहून लाग्रांजने सखोल संशोधन करून ते प्रसिद्ध केले.