जोसेफ रेमंड मॅककार्थी (१४ नोव्हेंबर, १९०८ - २ मे, १९५७) हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्याचे सेनेटर होते. हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते.
शीतयुद्धादरम्यान अमेरिकेत साम्यवादी ठिकठिकाणी घुसले असल्याचे जाहीर करून प्रसिद्ध व्यक्तींना ते साम्यवादी सोवियेत संघाचे गुप्तहेर असल्याची आवई ते उठवत असत आणि त्यांच्यावर खटले चालवत असत.