२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले.