जॉन फोर्ब्ज केरी (११ डिसेंबर, इ.स. १९४३:ऑरोरा, कॉलोराडो, अमेरिका - ) हा अमेरिकेचा माजी परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) आहे. १९८५ ते २०१३ दरम्यान केरी मॅसेच्युसेट्स राज्यामधील एक वरिष्ठ सेनेटर होते. डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य असणाऱ्या केरी यांना २००४ साली जॉर्ज डब्ल्यू. बुश विरुद्ध अध्यक्षीय निवडणुक लढण्यासाठी पक्षाकडून नामांकन मिळाले होते परंतु ते बुशकडून पराभूत झाले. सेनेटर असताना केरी परराष्ट्र धोरण समितीचा चेरमन होते.
डिसेंबर २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने आपल्या मंत्रीमंडळामध्ये परराष्ट्रसचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) ह्या महत्त्वाच्या पदासाठी जॉन केरीची नेमणुक केली. १ फेब्रुवारी २०१३ रोजी ह्या पदाची सुत्रे केरीने मावळती परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन हिच्याकडून हाती घेतली.
बाह्य दुवे