२०१६ च्या निवडणुकांमध्ये व्हान्स यांनी रिपब्लिकन उमेदवार (आणि नंतर राष्ट्राध्यक्ष) डॉनल्ड ट्रम्प यांना मोठा विरोध केला होता परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली व ते ट्रम्पचे प्रमुख पाठीराखे झाले. जुलै २०२४मध्ये ट्रम्प यांनी व्हान्सची २०२४ च्या निवडणुकीत आपले उपराष्ट्राध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड केली. अमेरिकेतील प्रमुख पक्षाकडून असे नामांकन मिळेलेले व्हान्स हे पहिलेच मरीन कोरचे सैनिक आहेत.
सामाजिक मुद्द्यांमध्ये, व्हान्स गर्भपात, समलिंगी विवाह, अल्पवयीन मुलांसाठी लिंगबदलाला आणि बंदूक नियंत्रणाला विरोध करतात. हे पुराणमतवादी धोरणांना प्रोत्साहन देतात. व्हान्स युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकन लष्करी मदत देण्याला विरोध करतात.[३][४][५][६] व्हान्स यांचे इतर काही विचार अमेरिकेतील रिपब्लिकनांपेक्षा वेगळे आहेत.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
व्हान्सचा जन्म जेम्स डोनाल्ड बोमन नावाने २ ऑगस्ट, १९८४ रोजी मिडलटाउन, ओहायो येथे बेव्हरली कॅरोल (पूर्वीच्या व्हान्स; जन्म १९६१) आणि डोनाल्ड रे बोमन (१९५९-२०२३) यांच्या घरी झाला. व्हान्स स्कॉट्स-आयरिश वंशाचे आहेत. [७][८] ते लहान असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. जेडी व्हान्सना त्यांच्या आईचा तिसरा नवरा बॉब हॅमेल याने दत्तक घेतल्यानंतर त्याच्या आईने जेडीच्या वडिलांचे नाव काढून टाकण्यासाठी त्यांचे नाव बदलून जेम्स डेव्हिड हॅमेल असे ठेवले. यावेळी वडीलांचे डॉनल्ड नाव काढल्यावरही जेडी हे टोपणनाव जपण्यासाठी स्वतःच्या एका भावाचे नाव वापरले. [९][१०]
व्हान्सने लिहिले आहे की त्यांचे बालपण अतिशय दारिद्र्य आणि हालात गेले. त्यांची आई अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती. [११] व्हॅन्स आणि त्याची बहीण लिंडसे यांचे संगोपन मुख्यत्वे त्यांच्या आजी-आजोबा जेम्स (१९२९-१९९७) आणि बॉनी व्हॅन्स (पूर्वीची ब्लँटन; १९३३-२००५) यांनी केले, ज्यांना ते "मामॉ आणि पापॉ" म्हणत. दोन्ही बाजूंचे त्याचे आजी-आजोबा केंटकीच्या ॲपेलेचिया भागातील होते. तेथून ते पुढे ओहायोला स्थलांतरित झाले. [१२][७][१३][१४][१५]
२०१४मध्ये आपल्या लग्नानंतर, व्हान्सनी त्यांच्या आजी-आजोबांचे व्हान्स हे आडनाव घेतले. [१६] २०१७मध्ये सेंटर कॉलेजने त्यांना मानद पदवी दिली. [१७]
चित्रपट दिग्दर्शक रॉन हॉवर्डने २०२०मध्ये या पुस्तकावर आधारित हिलबिली एलिजी हा चित्रपट बनवला. निवडक चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर तो नेटफ्लिक्सवर २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. [१९]
वैयक्तिक जीवन
व्हान्सने आपल्या हिलबिली एलिजी या आत्मचरित्रात लिहिले आहे की ते अगदी गरीब कुटुंबात त्याच्या एकट्या आई आणि आजी बरोबर वाढले होते. [१७] केंटकीमधील कठीण परिस्थितीला कंटाळून त्याच्या आईचे आई-वडील ओहायोमधील मिडलटाउन शहरात स्थलांतरित झाले. लहानपणी व्हान्सने "सुखी कुटुंबासह अमेरिकन स्वप्न" मिळविण्याची आशा ठेवली होती. स्वतःच्या आणि बिल क्लिंटन यांच्या लहानपणातील समानतेमुळे ते क्लिंटनचे चाहते होते. [२०]
२०११ च्या सुमारास, [२१] येल लॉ स्कूलमध्ये शिकत असताना व्हान्स त्यांची पत्नी उषा चिलुकुरी यांना भेटले. [२२] त्याने तिला "माझी येलमधील दैवी मार्गदर्शक" म्हणले आहे. [२२] २९१४मध्ये त्यांनी केंटकी येथे आंतरधर्मीय विवाह सोहळ्यात विवाह केला; [२३][२४] चिलुकुरी हिंदू आहेत आणि तर व्हान्स ख्रिश्चन आहेत. [२३][२५] त्यांच्या लग्नात व्हॅन्सचा "सर्वोत्तम मित्र", जमील जिवानी, [२६][२७] यांनी बायबल वाचन केले होते आणि नंतर जोडप्याला एका हिंदू पंडिताने आशीर्वाद दिला होता. [२२][२१] या जोडप्याला पुढे तीन मुले झाली.
^ abRothman, Joshua (September 12, 2016). "The Lives of Poor White People". The New Yorker. January 2, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 6, 2017 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "New Yorker 2016-09-12" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे