जवळा (दु) (उस्मानाबाद)

  ?जवळा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर उस्मानाबाद
जिल्हा उस्मानाबाद जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

जवळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक आणि ऐतिहासिक स्थान

जवळे दुमाला हे गाव बालाघाट डोंगर रांगेच्या पायथ्याशी, तेरणा नदीकाठी आहे. हे गाव प्राचीन असून पुरातत्व संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे गाव येथून जवळच असणाऱ्या तेर, तगर या प्राचीन संपन्न असणाऱ्या शहराचे एक उपग्राम आहे.

गावामध्ये रेणुका मातेचे (मूळ स्थान माहूर) एक मंदिर असून, गावातील ९६ कुळी मराठा जाधव घराण्याचे ते कुलदैवत आहे. त्यासोबत एक यमाई देवीचे मंदिर देखील आहे.

गावाचे नाव दुमाला असल्या कारणाने हे गाव एक वतन असून, मराठ्यांचे एक सरदार मेहेंदळे यांची गावावर जहागिरी असल्याचे पुरावे महसूल नोंदींमध्ये दिसून येतात. यावरून मध्ययुगीन काळात साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अधिपत्याखाली हे गाव असण्याची शक्यता आहे.

हवामान

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!