जयश्री टी. |
---|
|
जन्म |
जयश्री चित्रसेन तळपदे |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
कार्यक्षेत्र |
अभिनय (चित्रपट) |
---|
भाषा |
मराठी, हिंदी (चित्रपट) |
---|
वडील |
चित्रसेन तळपदे |
---|
जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी. (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी मराठी अभिनेत्री व नर्तकी आहे.
इ.स. १९६० च्या दशकात सहायक अभिनेत्री/ विनोदी व्यक्तिरेखेच्या भूमिकांमार्फत जयश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. काही बिगबजेट चित्रपटांतील गाण्यांवर तिने केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. उदाहरणार्थ, शर्मिली (इ.स. १९७१) चित्रपटातील रेशमी उजाला है, मैं सुंदर हूं (इ.स. १९७१) चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, तराना (इ.स. १९७९) चित्रपटातील सुलताना सुलताना या गाण्यांवरील नृत्यांनी तिला ख्याती मिळवून दिली.
अभिनेता चित्रसेन तळपदे हे तिचे वडील. तर हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री मीना टी., ऊर्फ मीना तळपदे ही तिची बहीण आहे[१].
चित्रपट कारकीर्द
संदर्भ
बाह्य दुवे