प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांची मूळ संकल्पना आणि पुढाकारातून पुणे शहरात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन घेण्यात येते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीच्या निमित्ताने साहित्य संमेलन भरविण्यात येते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे होते. दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अनंत दारवटकर होते. तिसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश महाराव होते. ही सगळी संमेलने बालगंधर्व रंगमंदिरात झाली आहेत.