चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव (कन्नड: ಚಿಂತಾಮಣಿ ನಾಗೇಶ ರಾಮಚಂದ್ರ ರಾಯ ; रोमन लिपी: Chintamani Nagesa Ramachandra Rao / C.N.
R. Rao ;) (३० जून, इ.स. १९३४; बंगळूर; कर्नाटक - हयात) हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.