ग्रामीण विकास लोक संस्था

ज्या भागातील ८५% लोकांचे जीवन शेती व शेतीवर आधारीत उद्योग-व्यवसायावर अवलंबून आहे. अधिकतर शेत जमीन हलकी व मध्यम व हलक्या प्रतीची असून संपूर्णतः पावसावर अवलंबून आहे, सिंचनाचे क्षेत्र फक्त ४.४३% इतके आहे.( संदर्भ : जनगणना २०११चा अहवाल ) ज्या भागातील मुख्य पीक ज्वारी असून आर्थिक पाहणी २०११ नुसार ज्वारी पीकाचे हेक्टरी उत्पादन ६९९ की. ग्रा. आहे. सरासरी जमीन धारणा २.७६% आहे. शेतमजूरी करणाऱ्या मजूरांना जेथे वर्षातील १८० ते २४० दिवसच बारमाही काम उपलब्ध असते, अन्य काळात हे मजूर कामासठी अन्यत्र हंगामी स्वरूपात स्थलांतरीत होऊन पावसाळ्यात आपापल्या गावी परत येत असतात. जिथे रोजंदारीचा दर प्रति दिन पुरुषासाठी २०० ते २५० पर्यंत आणि स्त्रियांसाठी १०० ते १५० रुपये असा आहे. सण २०११ च्या आर्थिक पाहणीनुसार  जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ५९,३९६/- इतके दर्शविण्यात आलेले आहे.

याचबरोबर लातूर जिल्हा ज्या विभागात येतो, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर, या ठिकाणची आवाहणे वेगळ्या प्रकारची आहेत हे लक्षात येते. आमची संस्था ज्या भागात काम करते, तो ’ मराठवाडा ’ (१९४८ पर्यंत हैद्राबाद स्टेटचा अविभाज्यपणे राहिलेला भाग ) विभाग महाराष्ट्र राज्याचा भाग असला तरी हा विभाग सर्वार्थाने महाराष्ट्र राज्यापेक्षा वेगळा असा आहे, यामुळे या विभागाचा विकास महाराष्ट्र राज्याच्या बरोबरीने आतापर्यंत कधीच झालेला नाही,याची पाळे-मुळे इतिहासात आहेत. हा विभाग सातत्याने ७०० वर्षापेक्षा जास्त काळ इस्लामी सरंजामी राजवटीत राहिलेला आहे, शेवटी शेवटी हैद्राबाद स्टेट जरी ब्रिटिश अधिपत्याखाली असला तरी प्रत्यक्ष अमंल मात्र निजामाचाच राहिलेला आहे. ब्रिटिश राजवट जरी आम्हाला नको होती तरी,या राजवटीचे अप्रत्यक्षपणे आम्हा भारतीयांस कांही फायदे पण झालेले आहेत. हे सर्व फायदे जसे भारताच्या इतर भागाला मिळालेले आहेत, तसे हैद्राबाद संस्थानातील जनतेला मिळालेले नाहीत, प्रामुख्याने सर्वांसाठी शिक्षणाची समान संधी आणि प्रगतिशील विचार प्रवाह याबाबतची जी संधी अन्य भारतीयांना ब्रिटिश राजवटीत मिळाली ती, मराठवाडा सह हैद्राबाद संस्थानमधील जनतेला मिळालेली नाही,याचे फार मोठे दुरगामी परिणाम मराठवाडा भागावर झालेले आहेत.

मराठवाड्यासह निजाम स्टेटमधील साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प राहिले. १९३१ मध्ये ते प्रमाण ५% होते, १९४१ मध्ये ते ९.३ % होते. सन १९८१ च्या जनगणनेच्या समयी हे प्रमाण अवघे ३२.९%असे होते, अर्थात महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य साक्षरतेपासून हे प्रमाण १४.१२ % अंतरावर होते. मराठवाडा विभागात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण १९७१ मध्ये १२.५७ आणि १९८१ मध्ये १८.२१ असे होते, म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य प्रमाणाच्या निम्म्यावर होते. आता यात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अजूनही ३३% ग्रामीण महिला निरक्षरच आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ३० ते ४०% असल्याचे पाहण्यास मिळते आहे.

अशा प्रकारची पार्श्वभूमि असलेल्या लातूर जिल्ह्यात, राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या “ गावाकडे चला “ या संदेशातून प्रेरणा घेऊन ग्रामीण विकास लोक संस्था गेल्या तीन दशकापासून ग्रामीण भागातील लोकांच्या विकास आणि सामाजिक बदलाच्या कामात संलग्न आहे. व्यक्तीच्या जीवनात तीन दशकाचा कालावधि तसा मोठा असतो, पण संस्थेच्या जीवनात इतका कालावधि तसा फार मोठा नसतो. तरी सुद्धा आमच्या संस्थेकडे असलेली साधणे-सामुग्री, मनुष्यबळ आणि उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर करून हाती घेतलेल्या कामात गुणवत्ता यावी, ती टिकून रहावी आणि उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त कार्यक्रम पार पडावेत, ज्याचा बहुसंख्य ग्रामीण लोकांना फायदा व्हावा या दिशेने जाण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न्केलेला आहे. आजवरच्या वाटचालीत संस्थेने केलेल्या कामातील प्रमुख उपलब्धी खालील प्रमाणे आहेत.

संस्था कार्याच्या मुख्य उपलब्धी :

१.     महिला मुक्ती प्रबोधन आणि सक्षमीकरण

१.     १९८० पूर्वी ज्यांनी अहमदपूर तालुका परिसरात स्त्रीमुक्तीच्या लढ्याची मुहर्तमेढ रोवली,त्या पहिल्या स्त्री कार्यकर्त्या कॉ. अनुसयाबाई नखाते यांचा वेठबिगार मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून ग्रामीण विकास लोक संस्था, या संस्थेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

२.     १९८४ मध्ये उदगीरच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी अहमदपूर येथील महिलांच्या वतीने अहमदपुरच्या इतिहासातील पहिला भव्य मोर्चा काढण्यात आला.

३.     महिला मुक्ती प्रबोधनासाठी सातत्याने प्रतिवर्षी अनेक गावातून प्रबोधन मेळावे आणि सभांचे आयोजन करण्यात आले.

४.     डाक्रा गटांची निर्मिती आणि प्रभावी अमलबजावणी

५.     लातूर आणि परभणी जिल्ह्यात बचत गट चळवळ सुरू करणारी पहिली संस्था.

६.     संस्थेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील , विशेषतः परित्यक्ता आणि विधवा अशा  महिलांनाचे ८० बचत गट तयार करून त्यांना सक्षम केले. या माध्यमातून संस्थेच्या वतीने सात लाखांचे अर्थ साह्य देऊन जोडधंदा उभा करणेसाठी मदत केली.

७.     मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटणेकडून आयोजित राज्यस्तरीय स्त्रीमुक्ती यात्रेचे अहमदपूर येथे भव्य स्वागत आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

८.     म्रराठवाडा स्तरावरील स्त्री हक्क परिषदेचे भव्य आयोजन, ज्यात २००० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.

९.     पीडीत परित्यक्ता महिलांना कायदा सल्ला साह्य मिळालेमुळे ३०० पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला, यापैकी १५२ प्रकरणात तडजोड झाली, ५६ जणींना नुकसानभरपाई मिळाली, पैकी १६ जणींना जमीनीवरचा हक्क मिळाला.

१०.  लातूर  उस्मानाबाद भूकंप पुनर्वसन कामात “ परित्यक्ता महिलांसाठी निवारा “ मागणी साठी दिर्घकाळ पर्यंत लढा आणि अंतिमतः परित्यक्ता महिलांसाठी त्या त्या गावात भुखंड उपलब्ध करून देणेबाबाबतचा राज्य शासनाचा ऎतिहासिक निर्णय. याच बरोबर पुनर्वसनात मिश्र वस्ती मागणीसाठी आंदोलन करणारी ऎकमेव संस्था.

११.  संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलाच पाहिजे असे धोरण निश्चित करून ते अमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

२.     ग्रामीण कामगारासाकांसाठीचे कार्य.

शेतमजूरांना बारमाही काम उपलब्ध व्हावे,समान व किमान वेतनाची अमलबजावणी आणि शेतमजूरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा व्हावा या उद्देशाने जवलपास १५ वर्षे चळवळ चालविण्यात आली,यात रोहयो कामाची दरवर्षी मागणी आणि अलबजावणी याचा समावेश राहिलेला आहे..  

  बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षण कार्यक्रम :

        मराठवाडा कदाचित महाराष्ट्रात बालमजूरीच्या प्रश्नावर कामाचा प्रारंभ करणारी “ ग्रामीण  

       विकास लोक संस्था “ ही पहिली संस्था असावी,तसेच काम करणाऱ्या मुलांसाठी “  ’

        बालकामगार ’ “असा शब्दप्रयोग करणारी पण ही संस्था पहिलीच असावी.

१.    संस्थेने १९८८ पासून बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. अनौपचारिक शिक्षण, ब्रीजकोर्स कॅम्प, बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागॄती अभियन आणि संगणकाच्या माध्यमातून साक्षरता आणि अभ्यास.

२.     संस्थेने चालविलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या कार्यक्रमातून किमान ५००० पेक्षा जास्त मुलांनी लाभ घेतलेला आहे, पैकी १००० पेक्षा जास्त मुलांनी पुन्हा शाळा प्रवेश केला, ज्यातील ५०० मुलांनी इयत्ता ४थी किंवा ७वीची बहिस्थ स्वरूपात परिक्षा देऊन पुढील इयत्तेत प्रवेश प्राप्त केलेला आहे.

३.    लातूर – उस्मानाबाद भूकंपग्रस्त भागातील शालाबाह्य मुलांसाठी चालविलेल्या ब्रीज कोर्स कॅम्प शिक्षण कार्यक्रमाचा १२५ मुलांनी लाभ घेतला.

४.    लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील ६ तालुका स्तरावर बालमजूरी निर्मूलन आणि मुलांच्या शिक्षणासाठी “ बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागृती अभियान “ यशस्वीपणे चालविण्यात आले.

५.    १९९२ साली स्थापित झालेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर बालमजूरी निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या “ बालमजूरी विरोधी मोहीम ’ या संघट्नेचे आम्ही संस्थापक सदस्य असून संस्थेने या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी ७ वर्षे कार्यरत राहून हे काम यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

६.     मराठवाडा स्तरावर आयोजित केलेल्या “ बालमजूरी निर्मूलन यात्रेचे “ संस्थेने नेतॄत्व करून “ बालमजूरी निर्मूलनाचा संदेश मराठवाड्यातील २४ तालुक्यांतील दिड लाख लोकांपर्यंत पोहंचविला आहे.

७.    वेठबिगार मोर्चाच्या वतीने लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून काढण्यात आलेल्या “ वेठगारी आणि बालमजूरी निर्मूलन प्रबोधन यात्रेचे “ नेतॄत्व पण ग्रामीण विकास लोक संस्थे केले आहे.

. हैद्राबाद मुक्ती सुवर्णमहोत्स्व निमित्ताने:

     हैद्राबाद मुक्ती सुवर्ण महोत्सव निमित्ताने संस्थेने १७ सप्टे. ते २ ऑक्टो.1998 या काळात    

     मराठवाड्यातील ६९ हुतात्मा स्मारंकाच्या मार्गे  “ राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार यात्रा “    

     काढून, हैद्राबाद मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची  आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली

     अर्पित करण्यात आली. ही यात्रा २७०० की. मी. पेक्षा  अधिक अंतराची होती. या काळात  

     यानुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी मराठवाडा विभागातील हा सर्वाधिक विशाल  

     कार्यक्रम होता, तो यश्स्वीपणे पार पडला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.या यात्रेच्या

     काळात १) हैद्राबाद मुक्ती लढ्याचा इतिहास, २) मराठवाड्याचे मागासलेपण आणि ३) राष्ट्रपिता

     म. गांधी यांचे विचार यानुषंगाने गावोगावी लोकसंवाद करण्यात आला.

५ . नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन कार्यक्रम:

१.    पाणलॊट विकास कार्यक्रम – सोरगा गाव

२.    नैसर्गिक संसाधणे व्यवस्थापन कार्यक्रम – केकतसिंदगी

३.    इंडो-जर्मन पाणलॊट विकास कार्यक्रम  नरवटवाडी – येलदरवाडी

४.    अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम – ६ गावे

५.    एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम – ग्रामस्थांना प्रशिक्षण

उपरोक्त कार्यक्रम अमलबजावणी परिणामी –

१.    उपरोक्त उल्लेखित कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण १२ गांवांच्या शिवारात ५००० हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकास कार्यक्रम राबऊन वाहून जाणाऱ्या मातीचे संरक्षण करण्यात आले. या कामामुळे प्रत्यक्षात २ लाख मनुष्यदिवस काम उपलब्ध झाले. आणि त्या त्या गावात सर्वांसाठी बारमाही रोजगार उपलब्ध झाला.

२.    कार्यक्रम कार्यान्वीत करण्यापूर्वी सर्वच्या सर्व गावे पाणी टंचाईग्रस्त होती, या सर्व गावात आजच्या परिस्थितीत मुबलक पाणी उपलब्ध आहे.

३.    शेतजमीनीची उत्पादकता वाढल्यामुळे गावातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे, त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले गेले आहे.

४.    पूर्वीपेक्षा सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे मजूरांचे होणारे हंगामी स्थलांतर थांबले आहे.

५.    या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलेमुळे, त्यांचा निर्णयप्रक्रीयेतील सहभाग वाढला आहे.

६ . पडीक विहिरीची दुरुस्ती आणि नवीन विहिरीचे मार्फत

   शेती आणि पीण्याच्या पाण्याची उपलब्धी.

१.    एम डी डी पी कार्यक्रमांतर्गत अल्पभुधारक शेतकऱ्यां साठी संस्थेने ५५ विहीरी खोदून दिल्या तसेच ४९ जुन्या विहिरी दुरुस्त करण्यात आल्या.

२.    यामुळे १४३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली, ज्याचा एकूण ३३७ अल्पभूधारकांना फयदा झाला.

३.    तसेच या उपलब्धीमुळे १८ गावातील ५४० कुटुंबाला पीण्याचे पाणी उपलब्ध झाले.

७ . बालीका विवाह प्रतिबंध कार्यक्रम :

   संस्थेच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील ३० गावातून २००६ ते २०१२ या  

   कालावधित “बालीका विवाह प्रतिबंध “ कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम सुरू  

   करणेपूर्वी या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ५८% होते, ते आज हे प्रमाण

   ३०% वर आलेले आहे.

८.    एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत

     गावस्तरावील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग

     भारत सरकर आणि राज्य शासनाच्या साह्यातून कार्यरत असलेल्या एकात्मिक पाणलोट  

     व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर द्यावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्था सहभागी

     असून यानुषंगाने लातूर जिल्ह्यातील एकूण ३६ गावातील प्रशिक्षणारथींना प्रशिक्षण देण्याची

     जबाबदारी शासनाने आमच्या संस्थेवर सोपवलेली असून संस्था हा कार्यक्रम सक्षमपणे राबवत

     आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेने ५ वर्षात एकूण २०० पेक्षा अधिक प्रशिक्षण

      कार्यक्रमाच्या माध्यमातून १६,७२५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले आहे.

९.    हवामान बदल स्वीकृतीकरन कार्यक्रम

     अफार्मच्या सहकार्याने संस्था अहमदपूर, जि. लातूर या भागातील चार गावातून “ हवामान  

     बद्ल स्वीकृतीकरन कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी असून काळाची गरज ओळखून भविष्यात

     या कामाची व्याप्ती आणि कार्यक्षा वाढवण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे.

१०. विहीर पुनर्भरन कार्यक्रम

सन २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या अवर्षण पार्श्वभूमिवर काळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात अधिक पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा या हेतूने संस्थेच्या मार्फत विहीर पुनर्भरन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आतापर्यंत दोन गावातील एकूण १३ विहीरींचे पुनर्भरन करण्यात आले असून, याचा भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पीक उत्पादन घेण्यास साह्य होणार आहे. या कामासाठी पुणे येथील कोरेगाव पार्क क्लब आणि स्पेक्ट्रम ग्रुप यांनी स्वयंस्फुर्त साह्य केलेले आहे.

----------------------------------------------------------------------------------------

संपर्कः मच्छींद्र गोजमे, अध्यक्ष, ग्रामीण विकास लोक संस्था (फीड), कराड नगर, नांदेड रोड अहमदपूर,

जि. लातूर, महाराष्ट्र – ४१३५१५ [[१]]  , Ph. No 7507752452

Our Sites :

https://sites.google.com/site/pirdlatur

https://www.youtube.com/user/mgojame

https://balikavikas.wordpress.com

http://www.facebook.com/pird.latur

http://facebook.com/machhindra.gojame

https://twitter.com/pird_latur

https://in.linkedin.com/in/machhindragojame

https://www.youtube.com/user/pirdlatur

http://m-gojame.blogspot.in/

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!