गुरू अंगददेव (पंजाबी: ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ) (मार्च ३१, इ.स. १५०४ - मार्च २८, इ.स. १५५२) हे शिखांच्या दहा गुरूंपैकी दुसरे गुरू होते. गुरू अंगदांचा जन्म मार्च ३१, १५०४ रोजी पंजाबातील विद्यमान मुक्तसर जिल्ह्यातील 'सराय नागा' या गावी एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातील नव लेहना असे होते. त्यांचे वडील फेरू हे पेशाने व्यावसायिक होते. त्यांच्या आईचे नाव माता रामो (यांची मनसा देवी, दया कौर अशी अन्य नावेही सांगितली जातात) होते.
१५३८ साली शीख मताचे संस्थापक गुरू नानक यांनी शिखांच्या गुरुपदाची धुरा स्वतःच्या मुलांकडे सोपवण्याऐवजी त्यासाठी लेहन्यास निवडले. भाई लेहना यांचे नामकरण अंगद असे होऊन, गुरू अंगद देव शिखांचे दुसरे गुरू बनले. नानकांनी आरंभलेले कार्य अंगदांनीही पुढे चालू ठेवले.