गिरीश दत्तात्रेय महाजन हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत[४][५].ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री होते[६].ते जामनेरचे आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रतील राजकारणात त्यांचा प्रभाव आहे. महाजन सलग सहा वेळा जामनेरमधूनविधानसभेवर निवडून आलेले आहेत.
गिरीश दत्तात्रय महाजन हे जामनेर रहिवासी आहेत. त्याच्या पत्नी साधना महाजन आहेत[८]
राजकीय कारकीर्द
गिरीश महाजन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना सरकार मध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री होते.ते पाच वेळेस जामनेरचे आमदार राहिले आहेत. उत्तर महाराष्ट्र मध्ये एकनाथ खडसे बरोबरच गिरीश महाजन असे दोन भाजप सत्ता ध्रुव आहेत.२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ३५,७६८ मतांनी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उम्मेदवर दिगंबर पाटील , शिवसेना उमेदवार ज्योत्स्ना विसपुते हे होते परंतु गिरीष महाजन निवडून आले. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमनेद्वार द्वितीय क्रमांकवर राहिले होते त्यांना ६७,७३० मते मिळाली होती गिरीष महाजन यांना १,३४९८ मते मिळाली होती. या मतदार संघामध्ये राजणेता राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष मधील संजय भास्करराव गरुड हे सुद्धा मातब्बर पुढारी आहेत. २०१९ र च्य्य काळात गिरीष महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या येथे नगराध्यक्ष आहेत [९]
२०१६ मध्ये एकनाथ खडसे वर त्यांच्या मंत्रिपदाचा गैर वापर केल्याचे आरोप लागले, खडसेना मंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्राच्या व राज्य पातळीवरील राजकारणात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले. भाजपा तील निर्णयांमध्ये महाजनांचा प्रभाव वाढला[१०]
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गिरीष महाजन १,१४,७१४ मतांनी निवडून आले. द्वितीय क्रमांकावर काँग्रेस आघाडी उम्मेदवार संजय गरूड यांना ७९ ,००० मते मिळाली. ३५०१४ मतांनी गिरीश महाजन विजयी झाले[११] महाजन जामनेर मतदारसंघांत सहाव्यांदा निवडून आले[१]
विवाद
१ जानेवारी २०२०ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन वर आरोप केले की त्यांच्या मुळेच आपणास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असा आरोप त्यांनी गिरीश महाजन,माजी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर केले[१२]. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ने जाणीवपूर्वक आपले तीकिट कापले असा आरोप केेेला[१३][१४].२०१९ मध्ये सांगलीली जिल्ह्यात पूर आलेला होता तेव्हा गिरीश महाजन पूर परिस्थितीत दौरा करण्यासाठी गेले. तिथे ते राष्ट्रीय आपत्ती दलाच्या नावेत बसून सेल्फी काढताना व हसतांना समाजमध्यमांमध्ये पाहिले गेले यावर राज्यातल, राष्ट्रीय बातमीपत्रांनी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने-विरोधकांनी संताप व्यक्त केला[१५][१६][१७]
^न्यूझ नेटवर्क., लोकमत (०४ जानेवारी २०२०). "माजी मंत्री गिरीश महाजन". लोकमत पेपर. ०४ जानेवारी २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
^आकुळे, हर्षल (२०१९). "विधानसभा निवडणुक : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेयांच्या मधील दुरावा नेमका कशा मुळे". मुंबई, महाराष्ट्र, भारत.: बीबीसी न्यूझ मराठी. pp. १.
^Hindi, Quint (2019). [बाढ़ पीड़ितों का हाल लेने गए थे BJP के मंत्री, सेल्फी पर घिरे "बाढ़ पीड़ितों का हाल लेने गए थे BJP के मंत्री, सेल्फी पर घिरे"] Check |url= value (सहाय्य). दिल्ली: The Quint. pp. १.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!