गाय एडवर्ड पियर्स (५ ऑक्टोबर , १९६७ :इलाय, कँब्रिजशायर , इंग्लंड - ) हा ऑस्ट्रेलियन [ १] अभिनेता आहे. याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी हा ऑस्ट्रेलियाच्या गीलाँग शहरात वाढला.
पियर्सने आपली अभिनय कारकीर्द ऑस्ट्रेलियातील दूरचित्रवाणीमालिका नेबर्स या दूरचित्रवाणीमालिकेपासून केली.
यानंतर त्याने द टाइम मशीन (२००२). कॉर्मॅक मॅककार्थीच्या द रोड (२००९), कॅथरीन बिगेलोचा युद्धपट द हर्ट लॉकर (२००९) आणि टॉम हूपरच्या इतिहासपट द किंग्स स्पीच (२०१०) या चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त पियर्स रिडले स्कॉटच्या प्रोमिथियस (२०१०), मार्वल अॅक्शन फिल्म आयर्न मॅन ३ (२०१३) सारख्या चित्रपटांतूनही दिसला आहे.
इंडीवायरने पियर्सला अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले. [ २]
२००७ टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पियर्स
वैयक्तिक जीवन
पियर्सने मार्च १९९७ मध्ये त्याच्या बालपणीची प्रेयसी, मानसशास्त्रज्ञ केट मेस्टिट्झशी लग्न केले. [ ३] [ ४] ऑक्टोबर २०१५ मध्ये, पियर्सने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. [ ५] त्यानंतर पियर्स डच अभिनेत्री कॅरिस व्हान हूटेनशी नातेसंबंधात आहे; ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. [ ६] [ ७] [ ८] [ ९]
संदर्भ
^ Dretzka, Gary (1 June 2003). "An Interview With Guy Pearce" . Movie City News . 15 November 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 February 2009 रोजी पाहिले .
^ Kiang, Jessica (1 January 2016). "30 Great Actors Who've Never Been Oscar Nominated" . Indiewire . 15 October 2022 रोजी पाहिले .
^ Lytal, Cristy (27 August 2008). "A real details Guy" . Los Angeles Times . 6 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित . 13 October 2016 रोजी पाहिले .
^ Grant, James (15 July 2003). "The Adventures of Guy Pearce" . MovieMaker . 4 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
^ Guglielmi, Jodi (13 October 2015). "Guy Pearce Announces Split from Wife Kate Mestitz After 18 Years of Marriage" . People . 8 August 2020 रोजी पाहिले .
^ Saner, Emine (21 August 2018). "' Everybody feels fragile': Guy Pearce on fame, family pressures and fatherhood at 50" . The Guardian . 25 August 2020 रोजी पाहिले .
^ Stone, Natalie (19 March 2016). "Game of Thrones' Star Carice van Houten Is Pregnant" . The Hollywood Reporter . 11 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित . 13 October 2016 रोजी पाहिले .
^ "Guy Pearce and Carice van Houten Welcome Son Monte" . People . 29 August 2016. 30 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 October 2016 रोजी पाहिले . Son Monte arrived last week in Amsterdam, van Houten’s rep tells People .
^ Pearce, Guy (29 August 2016). "A cute little package arrived and told us his name's Monte Pearce" . Guy Pearce verified Twitter account. 13 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित . 13 October 2016 रोजी पाहिले .