कॉस्टिया काउंटीअमेरिकेच्याकॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३,५२४ होती.[१]सान लुइस शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
कॉस्टिया काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. सुरुवातीय याचे प्रशासकीय केन्द्र सान मिगेल येथे होते. १८६३मध्ये प्रशासन सान लुइस येथे हलविण्यात आले. या काउंटीला येथून वाहणाऱ्या कॉस्टिया क्रीक या ओढ्याचे नाव दिलेले आहे.