के.व्ही. कृष्णराव

जनरल के.व्ही. कृष्णराव (इ.स. १९२४-३० जानेवारी, इ.स. २०१६:नवी दिल्ली, भारत) हे भारताचे लष्करप्रमुख होते. त्यांच्याच पुढाकाराने १९८० च्या दशकात भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला होता.

९ ऑगस्ट १९४२ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रह्मदेश, ईशान्य भारत व बलुचिस्तान आघाडीवर तैनात होते.

१९४७मध्ये काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानविरोधातील युद्धातही त्यांनी भाग घेतला. देशाच्या फाळणीनंतर पूर्व व पश्चिम पंजाबमध्ये उसळलेला हिंसाचाराविरुद्ध त्यांनी कारवाई केली.

१९६५-६६ या काळात लडाखमध्ये एका ब्रिगेडचे, तर १९६९-७० या काळात जम्मू विभागातील पायदळाचे त्यांनी नेतृत्व केले.

१९७०-७२ या काळात नागालॅंडमणिपूरमधील घुसखोरीविरुद्ध कारवाया करणाऱ्या पहाडी तुकडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. याच काळात १९७१ च्या बांगलादेश मुक्तियुद्धात पूर्व आघाडीवर लढणाऱ्या भारतीय लष्कराचे नेतृत्व करताना त्यांनी आसामचा सिल्हेट जिल्हा ताब्यात घेण्यात व ईशान्य बांगलादेश मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

३० जानेवारी, १९१६ रोजी जनरल कृष्णराव यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पुरस्कार आणि सन्मान

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!