कैलासवादिवु सिवन किंवा के.सीवन ( १४ एप्रिल१९५७) हे भारतीय अवकाश शास्त्रज्ञ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे ((इस्रो)) अध्यक्ष आहेत.[१]Archived 2022-01-13 at the Wayback Machine.
ते विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि लिक्विड प्रॉपल्शन स्पेस सेंटरचे माजी संचालक आहेत.[१] भारतीय अवकाश कार्यक्रमातील क्रायोजेनिक इंजिनाच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे सिवन यांना 'रॉकेट मॅन' असे म्हणले जाते.
वैयक्तिक आयुष्य
शिवन यांचा जन्म भारताच्या तामिळनाडू राज्याच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील मेला सरक्कलविलै या गावात झाला. त्यांच्या वडलांचे नाव कैलासवदिवू असून आईचे नाव चेल्लम आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत.
शिक्षण
शिवन यांचे प्राथमिक शिक्षण मेला सरक्कलविलै गावात तामिळ माध्यमाच्या सरकारी शाळेत झाले. १९८० मध्ये मद्रास येथील इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी एअरोस्पेस अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांच्या कुटुंबातील ते पहिले पदवीधर आहेत. पुढे त्यांनी भारतीय विज्ञान संस्था, १९८२ मध्ये बेंगलोर येथून एअरोस्पेस अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली. २००६ मध्ये त्यांना भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून पीएच.डी.ची पदवी मिळाली.[२]
कारकीर्द
१९८२ मध्ये त्यांनी इस्रोच्या पीएसएलव्ही प्रकल्पात प्रवेश केला. आणि मिशन प्लॅन, मिशन डिझाईन, मिशन एकत्रीकरण आणि विश्लेषणाच्या शेवटच्या दिशेने मोठे योगदान दिले.[३] त्यांनी इस्रोमध्ये मिशन संश्लेषण आणि विश्लेषणासाठी जागतिक स्तरीय सिम्युलेशन सुविधा चालू केली. जी मिशन डिझाइन, उप-प्रणाली पातळीचे प्रमाणीकरण आणि सर्व इस्रो प्रक्षेपण वाहनांमध्ये एव्हिओनिक्स सिस्टमच्या समाकलित प्रमाणीकरणासाठी वापरली जाते. त्यांनी एक अभिनव डे-ऑफ लॉंच पवन बायसिंग धोरण विकसित केले आणि अंमलात आणले. ज्यामुळे वर्षाच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही हवामान आणि वाऱ्याच्या परिस्थितीत रॉकेट प्रक्षेपण शक्य झाले.[४]
जानेवारी २०१८ मध्ये शिवन यांची इस्रोच्या संचालकपदी निवड झाली.[५] त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या अध्यक्षतेखाली इस्रोने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयानाचे प्रक्षेपण केले. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर पोचल्यास ही कामगिरी करणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश ठरेल.यापूर्वी अमेरिका, चीन आणि पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत संघाने ही कामगिरी केली आहे.[६]
पुरस्कार
2019 Abdul kalam award,tamilnadu government
२०१४ मध्ये सत्यभामा विद्यापीठ, चेन्नईकडून डॉक्टर ऑफ सायन्स.
२०१३ मध्ये एमआयटी अॅल्युमनी असोसिएशन, चेन्नईकडून दि डिस्टिंग्विशड अॅल्युमिनस.
२०११ मध्ये डॉ. बीरेन रॉय स्पेस सायन्स पुरस्कार
२००७ गुणवत्ता पुरस्कार भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन.
१९९९ मध्ये श्री हरि ओम आश्रम प्रेरित डॉ. विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार[७]