कीवर्ड्ज : जेंडर फॉर अ डिफरन्ट काइंड ऑफ ग्लोबलायझेशन हे विविध लेखकांनी लिहिलेले सहा निबंध असलेले पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने संपादिका नादिया ताझी या लिंगभाव या संकल्पनेबाबत चर्चा करतात. हे पुस्तक २००४ मध्ये प्रकाशित झाले असून हे 'कीवर्ड्ज' या शृंखलेचा एक भाग आहे. [१] ह्या पुस्तकाचे संपादन नाडीया ताझी यांनी केले आहे.[२]
कीवर्ड्ज' या शृंखलेबाबत'
'कीवर्ड्ज' या शृंखलेचे मुख्य उद्दिष्ट, महत्त्वाच्या विशिष्ट विषयांवर आंतरसांस्कृतिक संवाद घडवून आणणे हे आहे. विशिष्ट पार्श्वभूमीच्या संदर्भात लिंगभावाचा उलगडा करण्यासाठी सदर पुस्तक आफ्रिका, अमेरिका, अरब जगत, चायना, युरोप व भारत आदी विविध देशांतील आवाजांना विचारपीठ उपलब्ध करून देते. हे सहाही निबंध हे प्रांताच्या प्रतिनिधित्वासाठी नव्हे तर एक अर्थपूर्ण संवाद करण्यासाठी संपादकांनी एकत्र छापले आहेत.
सारांश
पुस्तकातील पहिले निबंध हे दक्षिण आफ्रिकेतील 'ग्रिकुआटाऊन' मध्ये स्थित आहे. लेखिका लिंडा वाल्डमन या ग्रिकुआटाऊनच्या संदर्भात 'बुरलिंगस' (Boorlings) (त्या शहरात जन्मलेले) 'इनकोमर्स' (जे शहरात बाहेरून बाहेरून आलेत) या संकल्पनांना उलगडून लिंगभाव, समाजातील स्थान व गटाच्या अंतर्गत जवळच्या नात्यांबद्दल महत्त्वाचे संबंध दाखवून देतात.
दुसरे निबंध हे अमेरिकेवर भाष्य करणारे आहे. यु.एस.ए. मध्ये लिंगभाव ही संकल्पना विशिष्ट स्त्रीवादाच्या संदर्भात विकास पावली. लिंगभाव हे कायद्यात कसे रूपांतरीत झाले यावर लेखक भाष्य करतात. क्वियर सिद्धांत (queer theory), क्वियर चळवळ (queer activism) व ट्रान्सजेंडरनी केलेल्या संघर्षाने लिंगभाव ही संकल्पनेला आव्हान मिळून त्याबद्दल नवीन पद्धतीने विचार करण्यास कसे प्रवृत्त झाले याबाबत पण लेखक येथे मांडतात. लिंगभावाला वेगळ्या पद्धतीने वापरणाऱ्या राजकीय चळवळी व लिंगभाव यांना वेगळे करता येत नाही असे या लेखाची मुख्य मांडणी आहे. अरब जगतात लिंग व लिंगभाव याचे लावलेल्या अर्थामधील बदल तिसऱ्या निबंधात दाखवलेले आहे. लेखक राजा बेन स्लामा अलगदपणे आधुनिक व आधुनिकपूर्व अरब जगतात हालचाल करून भिन्नलिंगी समाज व लिंगभावात्मक व्यवस्था टिकवण्यात हिंसेची भूमिका दाखवून देतात.
चौथ्या निबंधात लेखात चायनाच्या पार्श्वभूमीवर 'झिंगबी (लिंगभाव)' या शब्दाचे व्युत्पत्तीशास्त्र स्पष्ट करतात. चायनामध्ये लिंग हे लिंगभावाच्य आधी येते व लिंगावरच लिंगभाव आधारलेले असते. लेखक स्पष्ट करतात कि 'झिंगबी हे शब्द' सामाजिक या शब्दाशी जोडला गेला आहे व त्याचे चायनाचे भाषिक/ सांस्कृतिक संदर्भ लक्षात येण्यासाठी त्याची दाखल घेणे आवश्यक आहे. लेखिका चायनावर लादलेल्या लिंगभावाच्या युरोपकेन्द्री अर्थाच्या विरोधात मांडणी करतात.
पाचवे प्रकरण हे युरोप मधील लिंगभावाबाबतीतील चर्चेचा इतिहासाकडे पाहते. लेखक लिंगभावाबाबत विचार करताना येणाऱ्या काही अडचणींना ओळखून त्यावर चर्चा करतात तसेच लिंगभाव ही संकल्पना समजून घेण्यासाठी आवश्यक साधन व संकल्पनांबाबत बोलतात.
सहाव्या निबंधात आधुनिक भारतात लिंगभाव या संकल्पनेचे संकल्पनात्मक व अघळपघळ साधन म्हणून शोध घेतले गेले आहे. या लेखात भारतीय समाजव्यवस्थेतील अनेकविध गात व त्याच्यामधील श्रेणीबद्ध संबंधांकडे लक्ष वेधलेले आहे. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात लिंगभावाला विरोधात्मक दृष्टीकोनातून (एक विरुद्ध दुसरे) न बघता तुलनात्मक पद्धतीनेच बघव लागेल असे हे लेख मांडते.[३]
संदर्भ सूची