काळी सुई

काळी सुई

काळी सुई, लहान सुई किंवा काळा खापरी चोर (इंग्लिश: Deccan Black Robin; हिंदी: कलचुरी, दामा) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीएवढा असतो. पंखांवर पांढरा ठिपका असलेला काळा पक्षी असून पार्श्व तांबडे असते. मादी दिसायला राखी तपकिरी वर्णाची व तिच्या पंखांवर ठिपका नसतो.

वितरण

हे पक्षी भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या भागात आढळतात.

निवासस्थाने

हे पक्षी बगीचे, राया, शेतीचे क्षेत्र, पाषाण व निवडूंगांनीयुक्त प्रदेश, तसेच झुडपी विरळ जंगले व पानगळीची खडकाळ जंगले या ठिकाणी राहतात.

संदर्भ

  • पक्षीकोश- मारुती चितमपल्ली

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!