काबो सान लुकास (साचा:IPA-es) हे मेक्सिकोच्याबाशा कॅलिफोर्निया सुर राज्याच्या दक्षिण टोकाजवळ वसलेले शहर आहे. जवळील सान होजे देल काबो सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे.[१] २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती.[२] २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ६४,४६३ होती.[३]
येथे असलेली एल आर्को दे काबो सान लुकास ही समुद्रातील नैसर्गिक कमान जगातील सुंदर स्थळांपैकी एक समजली जाते.
हवामान
काबो सान लुकासचे हवामान विषुववृत्तीय वाळवंटी हवामान आहे.
काबो सान लुकास, बाशा कालिफोर्निया सुर साठी हवामान तपशील
येथील समुद्राच्या पाण्याचे तापमान हिवाळ्यात २१-२२ °C (७०-७२ °F) तर उन्हाळ्यात २८-२९ °C (८२-८४ °F) इतके असते.[६]
समु्द्रातील पाण्याचे सरासरी तापमान
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
७२.४ °F
22.4 °C
70.7 °F
21.5 °C
70.6 °F
21.5 °C
70.7 °F
21.5 °C
74.3 °F
23.5 °C
73.5 °F
23.1 °C
78.2 °F
25.7 °C
83.2 °F
28.5 °C
85 °F
२९.५ °C
84.1 °F
२९ °C
80.2 °F
26.8 °C
75.3 °F
२४ °C
उन्हाळ्यात येथील तापमान सान होजे देल काबोपेक्षा १-३ °C कमी असते. सहसा कोर्तेसच्या समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांनी दिशा बदलून पॅसिफिक समुद्राकडूनची दिशा पकडल्यास हा फरक अजून वाढतो. उन्हाळ्यात होणारी थंडरस्टॉर्म सहसा येथे येत नाहीत. येथे सान होजे देल काबोपेक्षा कमी पाउस पडतो परंतु हरिकेन आल्यास बराच काळ तुफान पर्जन्यवृष्टी होते. १४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हरिकेन ओडिल येथे जमिनीवर आले होते तेव्हा या दोन्ही शहरांचे अतोनात नुकसान झाले.[७]