कवी ही इंडोनेशियातीलजावा बेटावरील प्राचीन भाषा आहे. या देशातले काव्य याच भाषेत लिहिले गेले. कवी व संस्कृत भाषेचा जवळचा संबंध आहे असे दिसून येते. काही मत प्रवाह असेही मानतात की, या कावी भाषेचे नावही संस्कृतमधील 'काव्य' या शब्दावरूनच आले आहे. या भाषेची स्वतःची लिपी होती. ही लिपी पल्लव या भाषेवरून तयार झाली होती. आता कवी ही एक मृत भाषा आहे असे मानले तरी बाली बेटावर मात्र ती वापरात आहे. लोंबक या संस्कृतीतही हीच भाषा वापरात होती. सुसिला बुधी धर्म हा एक या भाषेतील ग्रंथ आहे. या ग्रंथात अध्यात्मासंबंधी माहिती आहे.
संदर्भ
Teselkin, Old Javanese (Kawi)
Zurbuchen, Introduction to Old Javanese Language and Literature: A Kawi Prose Anthology