कलिंग शैली ही भारतातील ओडिशा राज्य व आसपासच्या प्रदेशातील वास्तूशैली आहे. ही शैली पूर्वीच्या कलिंग देशात प्रचलित होती. यास नागर शैलीची एक उपशैली समजले जाते. ७व्या ते १३ व्या शतकात ती वाढली असे मानले जाते. या शिलीचा परिपोष प्रामुख्याने भुवनेश्वर येथे झाला. पुरीचे जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर ही याची प्रसिद्ध उदाहरणे होत.
संदर्भ व नोंदी
- प्राचीन कलाभारती, माटे म. श्री.