कंबोडिया अंगकोर एर (ख्मेर: កម្ពុជា អង្គរ អ៊ែរ) ही आग्नेय आशियातीलकंबोडिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००९ साली स्थापन झालेली ही कंपनी संयुक्तरित्या कंबोडिया सरकार व व्हियेतनाम एरलाइन्सच्या मालकीची असून तिची सर्व विमाने व्हियेतनाम एरलाइन्सकडून भाड्याने घेण्यात आली आहेत. स्थापनेपासून कंबोडिया अंगकोर एरचा देशामधील विमानवाहतूकीवर बव्हंशी ताबा आहे.