एस.एस. रामदास

एस.एस. रामदास हे एक भारतीय प्रवासी जहाज होते. पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून फेऱ्या करणारे ४०६ टनाचे हे जहाज १९३६मध्ये बांधले गेले.

दुर्घटना

हे जहाज १७ जुलै, १९४७ला (गटारी अमावास्या) मुंबई ते रेवस फेरीसाठी निघालेले असताना कुलाबा पोइंटपासून ८ किमी अंतरावर काश्याच्या खडकाजवळ अंदाजे सकाळी ८:०५ वाजता वादळात सापडून बुडले. यावरील ७००+ प्रवाशांपैकी ६९० व्यक्ती बुडाल्या.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!