एस.एस. राजामौली तेलुगू:ఎస్. ఎస్. రాజమౌళి |
---|
आरआरआर चित्रपटाच्या प्रचारादरम्यान |
जन्म |
कोडुरी श्रीशैला श्री राजामौली[१] १० ऑक्टोबर, १९७३ (1973-10-10) (वय: ५१) |
---|
इतर नावे |
जक्कण्णा[१] |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
कार्यक्षेत्र |
- पटकथा लेखक,
- दिग्दर्शक,
- निर्माता,
- अभिनेता
|
---|
भाषा |
तेलुगू |
---|
पुरस्कार |
पद्मश्री (२०१६)[२] |
---|
वडील |
के व्ही विजयेंद्र प्रसाद |
---|
पती |
|
---|
अपत्ये |
२ |
---|
धर्म |
हिंदू |
---|
कोडुरी श्रीशैला श्री राजामौली उर्फ एस.एस. राजामौली (तेलुगू:ఎస్. ఎస్. రాజమౌళి); (जन्म:१० ऑक्टोबर १९७३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत जे प्रामुख्याने टॉलीवूड साठी काम करतात.[३] राजामौली हे विशेष करून 'मगधीरा' (२००९), 'बाहुबली: द बिगिनिंग' (२०१५) तसेच 'बाहुबली२: द कन्क्लूजन' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत.[४][५][६]
वैयक्तिक आयुष्य
राजामौली यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७३ मध्ये सध्याच्या कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील 'मानवी' जवळील 'अमरेश्वरा कॅम्प' येथे झाला.[७] त्यांचे वडील के.व्ही. विजयेंद्र प्रसाद हे एक पटकथा लेखक असून आई राज नंदिनी ह्या एक घरगृहिणी आहेत.[८][९] राजामौली यांचे कुटुंब हे मूळचे आंध्र प्रदेशातील कोव्वूरचे आहे.[१०] त्यांचे प्राथमिक शिक्षण कोव्वूर येथे तर उच्च शिक्षण एलुरू येथे झाले.[११] त्यांची आई विशाखापट्टणम येथील असल्याने येथे त्यांचे वास्तव्य अनेक वर्षे होते.[१२]
राजामौली यांनी २००१ मध्ये रमा राजामौलीशी लग्न केले. रमाने राजामौली यांच्या अनेक चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले आहे. राजामौली यांनी रमाचा पहिल्या पती पासून झालेला मुलगा कार्तिकेय याला दत्तक घेतले आहे. या जोडप्याला अजून एक दत्तक मुलगी देखील आहे. कार्तिकेयने तेलुगू अभिनेता जगपती बाबूची भाची पूजा प्रसादशी लग्न केले.[१३][१४]
संदर्भ