एस. कलैवाणी

एस. कलैवाणी
वैयक्तिक माहिती
Full name एस. कलैवाणी
Citizenship भारत
जन्म २५ नोव्हेंबर १९९९
चेन्नई, तामिळनाडू, भारत
Sport
खेळ बॉक्सिंग (४८ किलो) श्रेणी

एस. कलैवाणी (२५ नोव्हेंबर, १९९९ - ) ही एक महिला भारतीय मुष्टियोद्धा आहे. ती ४८ किलो गटात खेळते.

२०१९ मध्ये विजयनगर येथे झालेल्या भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने १८ वर्षांची असताना रौप्यपदक पटकावले. २०१९ च्या भारतीय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिला ‘‘मोस्ट प्रोमिसिंग बॉक्सर‘’ म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानंतर नेपाळची राजधानी काठमांडू येथे २०१९ दक्षिण आशियाई खेळ|२०१९ साली झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

एस. कलैवाणीचा जन्म २५ नोव्हेंबर १९९९ रोजी तामिळनाडूमधील चेन्नईच्या वाशरमनपेट येथे झाला. [1] तिचे वडील एम. श्रीनिवासन एक हौशी बॉक्सर होते आणि तिचा भाऊ रणजीत हादेखील राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर होता. एक मुलाखतीत तिने सांगितले की तिच्या वडिलांना त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला होता. तिचे वडील तिच्या भावाला घरीच प्रशिक्षण देत असतानाच तिला बॉक्सिंगची आवड लहानपणीच निर्माण झाली होती. तिच्या घरच्यांना अनेक आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला, आणि एकवेळ तिच्या वडिलांना घराला आधार देण्यासाठी तसंच कलैवाणीच्या महत्त्वकांशा पूर्ण करण्यासाठी शेती करावी लागली. [2]

तिच्या वडिलांनी तिला केले आणि प्रशिक्षण देणे सुरू केले. कलैवाणीने चौथीत असताना बॉक्सिंगला सुरुवात केली होती. परंतु तिचा बॉक्सिंग करण्याचा निर्णय तिच्या शाळेतील शिक्षकांना फारसा पटला नव्हता, आणि तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अशीच त्यांची इच्छा होती. पण जेव्हा तिने उप-कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांची धारणा बदलली. अचानक कलैवाणी शाळेची ‘सुवर्णकन्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली. यातून तिला खूप प्रोत्साहन मिळाल्याचे ती सांगते.[2]

तिच्या बऱ्याच नातेवाईकांनाही तिचे बॉक्सिंग करणे नापसंत होते, कारण हा खेळ मुलींसाठी नाही, असे त्यांना वाटायचे. तिच्या काही नातेवाईकांनी तिच्या वडिलांना म्हणले की तिने बॉक्सिंग केले तर तिच्यासोबत कोणी लग्न करायला तयार होणार नाही. [3]

परंतु त्यांच्या विरोधामुळे तिचे वडील निराश झाले नाहीत, आणि आपल्या मुलाप्रमाणेच आपल्या मुलीलासुद्धा प्रशिक्षण दिले. तिला बॉक्सर बनवण्याचे श्रेय ती तिच्या वडिलांना आणि भावाला देते. तिचे वडिलांना वाटायचे की त्यांच्या मुलानेही उत्कृष्ट बॉक्सर व्हावे, पण आर्थिक मर्यादांमुळे त्यांनी फक्त त्यांच्या मुलीवरच लक्ष आणि संसाधने केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.[3]

व्यावसायिक यश

एस. कलैवाणी हिने नऊ वर्षांची असताना प्रथम बॉक्सिंग ग्लोव्हज घातले. २०१२ साली झालेल्या महिलांच्या उप-कनिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये तिने कांस्यपदक जिंकले. [1]

२०१९ मध्ये वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले.[2]

तिचे व्यावसायिक कारकिर्दीतले सर्वात मोठे तिला २०१० साली काठमांडूमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मिळाले, जेव्हा तिने नेपाळच्या महार्जन ललिता हिला ४८ किलो प्रवर्गात पराभूत करून, भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. [4]

आता भारताच्या या तरुण बॉक्सरने आपल्या देशासाठी २०२४ ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. कलैवाणी सध्या ४८ किलो प्रवर्गात खेळते, पण ऑलम्पिकमध्ये हा प्रवर्गच नाही. त्यामुळे ऑलपिकमध्ये भाग घेण्यासाठी तिला जास्त वजनाच्या प्रवर्गात खेळण्यास सुरुवात करावी लागेल.

संदर्भ

http://www.indiaboxing.in/boxerdetails.php?regno=11803 [1]

https://scroll.in/field/909398/tamil-nadus-kalaivani-is-emerging-as-the-surprise-package-in-indian-womens-boxing [2]

https://www.deccanchronicle.com/sports/in-other-news/010220/packing-a-punch-3.html [3]

https://www.fistosports.com/interview-skalaivani-boxing-keeps-my-head-straight-inspire-institute-for-sport-iis-ronald-simms-indian-boxing-talent [4]

https://www.bbc.com/marathi/india-55782323 [5]

पदके

उप-कनिष्ठ महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१२ मध्ये १ कांस्यपदक

ज्येष्ठ महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१९ मध्ये १ रौप्यपदक

दक्षिण आशियाई गेम्स, काठमांडू २०१९ मध्ये १ सुवर्णपदक

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!