एच.एम.एस. व्हिक्टरी नावाच्या रॉयल नेव्हीच्या सहा नौका होत्या.
इंग्लिश नौका व्हिक्टरी (१५६९) - ४२ तोफा असलेली नौका. ग्रेट क्रिस्टोफर नावाने बांधली गेलेली ही नौका रॉयल नेव्हीने १५६९मध्ये विकत घेतली व १६०८मध्ये भंगारात काढली.
एच.एम.एस. व्हिक्टरी (१६२०) - ४२ तोफा असलेली नौका. १६२०मध्ये डेप्टफोर्ड येथे बांधलेली आणि १६६६मध्ये ८२ तोफा चढवलेली सेकंड रेट नौका. १६९१मध्ये भंगारात काढली गेली.
एच.एम.एस. व्हिक्टरी (१६७५) - १०० तोफा असलेली फर्स्ट-रेट नौका. ही १६७५मध्ये रॉयल जेम्स नावाने बांधली गेली. हीचे मार्च ७, इ.स. १६९१ रोजी पुनर्नामकरण केले गेले. १६९४-९५मध्ये पुनर्बांधणी झाल्यावर फेब्रुवारी १७२१मध्ये आगीत भस्मसात झाली.