इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकॅडमी भारतातील वैमानिक प्रशिक्षणसंस्था आहे. याची स्थापना इ.स. १९८५ मध्ये झाली. येथे शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे नागरी विमान वाहतूक संचालनालय (डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन- डी. जी. सी. ए.) व आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संस्था यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आखून शिकवले जातात. ॲकॅडमीमध्ये व्यावसायिक वैमानिक परवाना प्रशिक्षणातील दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याच संस्थेमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (एव्हिएशन) ही पदवीही घेता येते.
इतर वैमानिक प्रशिक्षण संस्था
- द बॉम्बे फ्लाइग क्लब मुंबई
- नागपूर फ्लाइग क्लब नागपूर.
- फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमी , सिकंदराबाद
बाह्य दुवे