रवी दत्त शर्मा, जे आर. डी. शर्मा म्हणून प्रसिद्ध आहेत, हे भारतातील गणित पाठ्यपुस्तक लेखक आहेत.[१] त्यांची गणिताची पुस्तके सर्वाधिक विकली जातात. त्यांची पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत.[२][३][४]
जयपूरच्या राजस्थान विद्यापीठातून ते विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे दोन्ही वेळा दुहेरी सुवर्णपदक विजेते आहेत. ते सध्या तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असणाऱ्या विज्ञान आणि मानवता विभागाचे प्रमुख आहेत. तसेच ते आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.[२]
सुरुवातीचे जीवन
आर.डी. शर्मा यांचा जन्म राजस्थानच्या अल्वरमधील भूपखेरा गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती आणि त्यांनी फक्त गणिताचा अभ्यास केला. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पदवी पदव्युत्तर पदवी आणि गणितात पीएचडी पूर्ण केली.
कारकीर्द
ते १९८१ मध्ये आर.आर. कॉलेज, अलवर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सध्या ते आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथील उपप्राचार्य आहेत.