सर रामास्वामी चेट्टी कंदस्वामी षण्मुखम चेट्टी (१७ ऑक्टोबर १८९२ - ५ मे, १९५३) एक भारतीय वकील, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. १९४७ ते १९४९ पर्यंत ते स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री होते. १९३३ पासून ते १९३५ पर्यंत ते भारताच्या केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि १९३५ ते १९४१ दरम्यान कोचीन राज्याचे दिवाण होते.
षण्मुखम चेट्टी यांचा कोईंबतूर येथे १८९२ साली जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन महाविद्यालय आणि मद्रास विधी महाविद्यालय या काॅलेजांत त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर, षण्मुखम चेट्टी भारतीय राष्ट्रीय स्वराज पक्ष आणि जस्टिस पार्टी यांच्या माध्यमांतून राजकारणात उतरले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!