आर. नागरत्नम्मा (१९२६ - २०१२) या कन्नड नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका होत्या. त्यांनी बंगलोरमध्ये स्त्री नाटक मंडळी या महिलांच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली. त्यांनी पौराणिक नाटकांतून पुरुष भूमिकाही केल्या होत्या.
त्यांना १९९२मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २०१२मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.. याशिवाय त्यांना टागोर रत्न पुरस्कार आणि गुब्बी वीरण्णा पुरस्कार मिळाले होते.