आनंद साधले

आनंद साधले (मूळ नाव आत्माराम नीलकंठ साधले]] हे मराठीतले एक विद्वान लेखक होते. 'हा जय नावाचा इतिहास' ह्या युधिष्ठिराला महाभारताचा खलनायक ठरवणाऱ्या कादंबरीमुळे आनंद साधले यांना सुरुवातीला कुप्रसिद्धी, पण नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली. ह्या कादंबरीचे क्रमश: प्रकाशन करणे मराठीतील अनेक मासिकांनी नाकारले. शेवटी 'दीपावली'ने त्यांच्या मासिक अंकांत ती प्रसिद्ध करायला सुरुवात केली. महाभारताच्या अनेक अभ्यासकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली, पण सामान्य वाचकांनी तिला डोक्यावर घेतली. कादंबरी जसजशी पुढॆ सरकत गेली तसतसे तिचे विरोधक हळूहळू थंडावले.

दमयंती सरपटवार या अधिकच्या टोपणनावाने आनंद साधले यांनी काहीसे चावट वाटणारे लेखनही केले आहे.

आनंद साधले ह्यांचे वास्तव्य तेलंगणातील हैदराबाद येथे होते. नंदिनी साधले हे त्यांच्या पत्नीचे नाव.

आनंद साधले यांनी लिहिलेली पुस्तके

  • आनंदध्वजाच्या कथा (कथासंग्रह)
  • इसापनीती - भाग १, २ (कादंबरी, बालसाहित्य)
  • गीतगोविंद
  • दहा उपनिषदे - भाग १, २
  • नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर (ज्ञानेश्वरांना समकालीन असलेला व राजा रामदेवराव यादव याच्या दरबारात बसत असलेला कवी नरेंद्रपंडित याने लिहिलेल्या रुक्मिणीस्वयंवर या काव्याचा रसाळ भावानुवाद)
  • महाराष्ट्र रामायण (वाल्मीकी रामायणाचा महाराष्ट्राशी संबंधित असा कथाभाग)
  • हा जय नावाचा इतिहास आहे (कादंबरी)
  • हितोपदेश - भाग १, २
  • धन्य अंजनीचा सुत (कादंबरी)

साधले यांच्यावरील पुस्तके

  • आनंद साधले : साहित्यसूची (आनंद साधले यांच्या साहित्याची सूची, सूचिकार- उमा दादेगावकर )

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!