अलेक्झांड्रिया हे इजिप्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे बंदर आहे. अलेक्झांड्रिया इजिप्तच्या उत्तरेकडील भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
अलेक्झांड्रिया प्राचीन आणि अर्वाचीन काळात जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक होते. इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट ह्याने अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली.