अराईज इंडिया लिमिटेड ही दिल्ली, भारत येथे स्थित इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी दूरचित्रवाणी, इनव्हर्टर (यूपीएस आणि साईनवेव्ह), वॉटर पंप (मोनोब्लॉक, सबमर्सिबल आणि सेंट्रीफ्यूगल), होम आणि किचन उपकरणे (मिक्सर ग्राइंडर, इंडक्शन कुक टॉप, ज्युसर मिक्सर ग्राइंडर्स, वॉटर हीटर आणि स्मार्ट) यासह विविध उत्पादनांचे उत्पादन करते. तसेच अँडॉईडवर आधारित दूरदर्शन सेट देखील बनवतात.
अविनाश जैन हे कंपनीचे अध्यक्ष व एमडी आहेत. त्यांनी आपला भाऊ अमित जैन यांच्यासह कंपनीच्या विकासाचे नेतृत्व केले. [१][२] अराईज इंडिया लि. चे भारतात ३००० हून अधिक कर्मचारी व ४५ कार्यालये आहेत. [३] याचे कॉर्पोरेट कार्यालय दिल्लीच्या द्वारका येथे असून हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात दोन विशेष उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीचे भारतात ६००० हून अधिक वितरक आणि १,००,००० विक्रेते आहेत.