अनिल वसावे |
---|
|
जन्म |
२ एप्रिल १९९४ नंदुरबार, महाराष्ट्र |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
शिक्षण |
औषधशास्त्र पदविका |
---|
पेशा |
गिर्यारोहक |
---|
अनिल वसावे (२ एप्रिल, १९९४ - ) हा एक भारतीय गिर्यारोहक आहे. किलिमांजारो शिखरावर चढणारा हा महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पहिला गिर्यारोहक आहे. हा २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता किलीमांजारो शिखरावर चढून गेला. तेथे त्याने भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचली.[१]
आतापर्यंतची शिखरे
२६ जानेवारी २०२१ : माऊंट किलीमांजारो[१][२]
२६ जानेवारी २०२२ : माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प[३]
७ ऑगस्ट २०२१ : माऊंट एलब्रस[४]
पुढील योजना
७ एप्रिल ते ७ जून २०२३ दरम्यान अनिल वसावे माऊंट एव्हरेस्टवर चढाई करणार आहेत. या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली आहे.[५][६]
पुरस्कार
हाय रेंज ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड[७]
संदर्भ