अनिल बाबर

अनिल कलजेराव बाबर

विधानसभा सदस्य
खानापूर विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१९ – २०२४

जन्म ७ जानेवारी, १९५० (1950-01-07)
गार्डी (विटा)
मृत्यू ३१ जानेवारी, २०२४
सांगली
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना शिंदे गट
पत्नी शोभा बाबर
निवास विटा
व्यवसाय राजकारण

अनिल कलजेराव बाबर मराठी राजकारणी होते. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द ही वयाच्या १९ व्या वर्षी त्यांच्या गावी गार्डी येथील ग्रामपंचायती मधून केली. लोकांनी त्यांची समाजसेवेची आस समजून त्यांना १९६९ मध्ये गार्डी गावचे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले आणि तिथून पूढे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.१९७२ साली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून गार्डी गटातून निवडून आले.१९७७ साली ते पंचायत समिती सदस्य होऊन त्याच वेळेस खानापूर पंचायत समितीचे उपसभापती झाले.१९८२ साली ते सभापती पदावर विराजमान झाले. पुढे १९८९ पर्यंत त्यांनी खानापूर तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले.१९८९ साली त्यांनी काँग्रेसमधून त्यांच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून १ ली विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा त्यांनी तेव्हाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार कै.हणमंतराव पाटील यांचा कमी मतांमध्ये पराभव केला. मात्र १९९४ साली त्यांना आटपाडी तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी विजयापासून रोखले. या काळात भाऊंच्या हातून कामे घडली नाहीत. याचं कारण राज्यात शिवसेनेचे सरकार व इथले आमदार यांनीही शिवसेना भाजप महायुतीला पाठिंबा दिला. अनिलभाऊ हे काँग्रेसमध्ये त्यामुळे जी काही कामे झाली ती महायुती व तत्कालीन आमदार राजेंद्रआण्णा यांच्या माध्यमातून झाली.१९९९ साली अनिलभाऊंनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्याचं वेळेस विद्यमान आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे देखील राष्ट्रवादीत गेले. परंतु आण्णांनी दिलदार मनाने अनिल बाबर यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून घोषित केले. आणि त्यांच्या पाठिंब्यावर अनिलभाऊ दुसऱ्यांदा आमदार बनले. भाऊंनी त्यांचे टेंभूचे काम सुरू ठेवले. परंतु पराभव त्यांची पाठ सोडत नव्हता.२००४ साली काही मतभेदांमुळे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे आमदार अनिल बाबर यांच्यापासून बाजूला झाले. व त्यांनी तत्कालीन अपक्ष उमेदवार ॲड. सदाशिवराव पाटील यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत अनिलभाऊ सदाशिवराव पाटील यांच्याकडून पराभूत झाले.२००९ साली पुन्हा आटपाडीचे देशमुख घराणे अनिलभाऊंकडे गेले. तेव्हा अनिल बाबर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु काँग्रेस पक्षाची ताकद व पैशाच्या जोरावर सदाशिवराव पाटील सलग दुसऱ्यांदा निवडून आले. पण थांबतील ते बाबर कसले..!

जनतेत जाणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे हे कार्य त्यांचे सुरूच होते. २०१२ साली खानापूर तालुका पंचायत समितीवर बाबर गटाची सत्ता त्यांनी कायम ठेवली.आटपाडी तालुक्यात देशमुख घराण्याची सत्ता कायम असे. परंतु विट्याच्या पाटलांचा गट एवढा मतदारसंघात भक्कम नव्हता. याचाच फायदा अनिल बाबर यांना पुढच्या काळात झाला.२०१४ साली देशात मोदी लाटेत भाजपचे सरकार आले.वाहणारे वारे पाहून अनिलभाऊंनी भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.व ते विधानसभेला पुन्हा उभे राहिले.तेव्हा झालेल्या चौरंगी लढतीत अनिल बाबर हे निवडून आले.त्यांनी तत्कालीन काँग्रेस आमदार सदाशिवराव पाटील यांचा २१००० मतांनी पराभव केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार अमरसिंह देशमुख व भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला.महाराष्ट्रात सुद्धा महायुती सरकार आले.५ वर्षांच्या काळात रखडलेले टेंभू योजनेचे काम आमदार अनिल बाबर यांनी ५०% पूर्ण केले.खानापूर तालुका व विसापुर सर्कल पूर्ण पाण्याखाली आणला.राहिलेला आटपाडी तालुका निवडणुकीनंतर जलमय करून टाकू असे वचन आटपाडी तालुक्याच्या जनतेला दिले.याच वचनाला साक्ष ठेवून आटपाडी तालुक्यातील राजेंद्रअण्णा देशमुख,अमरसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर,हणमंतराव देशमुख, जयदीप भोसले अशा अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार अनिल बाबर यांना जाहीर पाठिंबा दिला.या जनशक्तीच्या जोरावर आमदार अनिल बाबर २०१९ साली सलग दुसऱ्यांदा निवडून आले.तेव्हा त्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला.२०२२ साली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन जो उठाव केला होता.त्यात त्यांना आमदार अनिल बाबर यांनीही मोलाची साथ दिली.२०१९ ते २०२४ या काळात अनिलभाऊंनी काही कामे महाविकास आघाडी तर उर्वरित विकासकामे महायुतीच्या माध्यमातून पूर्ण केली.२०२३ अखेर खानापूर आटपाडी विसापूर सर्कल या मतदारसंघाचा गुंठा आणि गुंठा आमदार अनिल बाबर यांनी पाण्याखाली आणला.टेंभू योजना पूर्ण केली.शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले.म्हणून सर्वांनी त्यांना टेंभू योजनेचे जनक अशी उपाधी दिली.जानेवारी २०२४ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!