अनिल फडके (प्रकाशक)

अनिल फडके (जन्म : २ नोव्हेंबर १९५२; - २५ ऑगस्ट २०१७) हे मुंबईतील मनोरमा प्रकाशनचे मालक होते.[ संदर्भ हवा ]

अनिल फडके यांनी फडके यांनी ४० वर्षे आध्यात्मिक आणि संस्कारक्षम ग्रंथ, पुस्तके तसेच कथा, कादंबऱ्या, सामाजिक विषयाला वाहिलेली हजार बाराशेवर पुस्तके प्रकाशित केली. पुस्तकांच्या किंमती अत्यंत कमी ठेवून वाचक जोडण्याची किमया त्यांनी साधली. आजपावेतो शेकडो पुस्तके प्रकाशित करून महाराष्ट्रात ​तसेच देश-परदेशात त्यांनी ती असंख्य वाचकांपर्यंत पोहचवली व प्रकाशन क्षेत्रात नावलौकिक मिळवला.[ संदर्भ हवा ]

एका वर्षात २० ते २४ पुस्तके काढणे ही मनोरमा प्रकाशनची ख्याती होती. त्यांत इंद्रायणी सावकार, कुसुम अभ्यंकर, गुरुनाथ नाईक, जयवंत दळवी, बाबुराव अर्नाळकर, मीना देशपांडे, रामचंद्र सडेकर, वसुंधरा पटवर्धन, वामन देशपांडे, वि.श्री. जोशी, शांता शेळके, शिरीष पै, शैलजा राजे, श्रीकांत सिनकर, श्री.ना. पेंडसे अशा प्रकारच्या लेखकांचा अंतर्भाव आहे.[ संदर्भ हवा ]

एरवी रहस्यकथा म्हणजे ती निकृष्ट कागदावरच छापलेली असणार असे ठरून गेले होते. फडके यांनी बाबुराव अर्नाळकरांच्या दोन दोन रहस्यकथा एकत्र आणून त्या पांढऱ्या शुभ्र कागदांवर छापल्या. असे गुळगुळीत कागदावर छापलेले आपले पुस्तक पाहून डोळे अधू झालेल्या बाबुरावांच्या डोळ्यांत पानी तरळले. बराच वेळ ते त्या पुस्तकातील पानांवर हात फिरवत राहिले होते.[ संदर्भ हवा ]

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!