Anikspray (en); अनिक स्प्रे (mr) skimmed milk powder and dairy product brand in India (en); skimmed milk powder and dairy product brand in India (en) Anik Spray (en)
अनिक स्प्रे
skimmed milk powder and dairy product brand in India
अनिकस्प्रे किंवा अनिक स्प्रे ही लिप्टन इंडियाने विकसित केलेली आणि सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्किम्ड मिल्क पावडर ब्रँडपैकी एक आहे. हा ब्रँड आजही लोकप्रिय आहे. तथापि, १९९१ नंतरच्या उदारीकरणानंतरच्या काळात झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे त्याचा बाजारातील वाटा मोठ्या प्रमाणात कमी झाला. ही दुधाची पावडर ताज्या दुधापासून बनवल्यामुळे पाण्याच्या संपर्कात येताच त्यात पटकन मिसळण्याची प्रक्रिया सुरू होते. तसेच यात गुठळ्या होत नाहीत. यामुळे ही भारतीय स्वयंपाकघरात लोकप्रिय झाली आणि ताज्या दुधाला पर्याया म्हणून दुधाचा चहा बनवण्यासाठी वापरली जाऊ लागली. [१][२]
इतिहास
ऐन भरभराटीच्या काळात, अनिक स्प्रे हा ब्रँड लिप्टन इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने मिळून विकसित केला होता. [२][३][४] १९९९ मध्ये, हिंदुस्तान युनिलिव्हरने आपले दुग्धजन्य पदार्थ, अनिक, अनिकस्प्रे आणि अनिक घी, हे ब्रँड न्यूट्रीशिया (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला विकले. या कंपनीची मालकी नुमिको नावाच्या डच कंपनीकडे होती. [३][५]
२००३ मध्ये न्युमिकोने भारतात आपले कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आणि मिराज इम्पेक्सच्या नेतृत्वात असलेल्या चार कंपन्यांच्या समूहाला न्यूट्रीशिया कंपनी विकली. [६][७] मिराज इम्पेक्सशी संबंधित कराराचा आराखडा अशोक फडणीस यांनी केला होता. ते दुग्ध व्यवसायात दिग्गज होते आणि पूर्वी मध्य प्रदेश डेरी फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक होते. [६][८]