अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर (जन्म : १८ सप्टेंबर १९१५; - ९ ऑक्टोबर १९९९) हे एक नाटकांत काम करणारे गायक नट होते. मराठी संगीत नाटकांत काम करू इच्छिणाऱ्या सुमती टिकेकर यांच्यासारख्या अनेकांना त्यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण दिले. अनंत दामले यांनी सुमारे २१०० नाट्यप्रयोगांत नारदाची भूमिका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दामले यांना नूतन पेंढारकर हे नाव दिले. अनंत दामले स्त्री-भूमिकाही करत. ते एक उत्तम नाट्यदिग्दर्शक होते.
अनंत दामले यांची भूमिका असलेली मराठी नाटके
- अशी रीत प्रेमाची
- आघाडीवर
- संगीत एकच प्याला
- करीन ती पूर्व
- कृष्णार्जुन युद्ध
- संगीत संत गोरा कुंभार
- घराबाहेर
- जुने ते सोने
- डेव्हिड व किशोरी
- तिथे कर माझे जुळती
- संत तुकाराम
- देवयानी
- पंढरपूर
- प्रेमशोधन
- बुवाबाजी
- भांगेची तार
- भाव तोचि देव
- महानंदा
- संगीत मानापमान
- मृच्छकटिक
- मोराचा नाच
- रुक्मिणी स्वयंवर
- लग्नाची बेडी
- सत्तेचे गुलाम
- सत्यविजय
- सत्याग्रही
- संन्याशाचा संसार
- संन्याशाचे लग्न
- संशयकल्लोळ
- सावित्री
- सासुरवास
- साक्षात्कार
- सुवर्णतुला
- संगीत सौभद्र
- स्त्री-पुरुष
- स्वयंवर
- स्वामी
- हॅम्लेट
- हळदीकुंकू
- हाच मुलाचा बाप
- हिरवा चुडा