अग्नि-पी किंवा अग्नि-प्राईम एक संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे स्फोटक क्षेपणास्त्र आहे जे सामरिक सक्ती कमानद्वारे संचालित अग्नि-१ आणि अग्नि-२ चे अनुक्रमज असून त्यातील सुधारित प्रणोदक, मार्गनिर्देशन आणि मार्गदर्शन यंत्रणे सह एकत्रित मोटर केसिंग, मॅन्युवेव्हरेबल पुनःप्रवेश वाहन यामधये लक्षणीय सुधारणा केल्या आहेत.[१]अग्नि क्षेपणास्त्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मालिकेतील हे सहावे क्षेपणास्त्र आहे.
इतिहास आणि विकास
२०१६ पासून, विविध माध्यम संस्थाने नोंदवले आहे कि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यथार्थता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी अग्नि-४ आणि अग्नि-५ च्या तंत्रज्ञानाचे उद्ग्रहण करून अग्नि-१ चे अग्नि-१पी नावाचे अनुक्रमज विकसित करत आहे.[२]
२८ जून २०२१ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने अब्दुल कलाम बेटातून अग्नि-पीची (पूर्वी अग्नि-१पी म्हणून ओळखले जाणारे) यशस्वीरीत्या चाचणी केली. हे दोन टप्प्याचे घन-इंधन क्षेपणास्त्र आहे जे डब्यात साठवले जाऊ शकते आणि रस्ता आणि रेलमार्गे वाहतुकीने वाहून नेता येईल. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनेने सुरू केलेल्या अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्रांचे एक नवीन वर्ग आहे जे अग्नि-३ च्या अर्ध्या वजनाचे आहे आणि यात सुधारित मार्गदर्शन यंत्रणा आणि प्रणोदन यंत्रणा आहे ज्यात १०००-२००० किमी अंतराचे क्षेत्र व्यापण्याची क्षमता आहे.[३][४][५]