अक्षय पात्र फाउंडेशन ही १२ लाख विद्यार्थ्याना मोफत शाळेत मधल्या वेळचे खाणे/आहार हा प्रकल्प राबवणरी जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे.[१][२]
इतिहास
गुरुराज देशपांडे हे १९७१-७२ मधे कर्नाटकातून अमेरिकेत गेले व ९० च्या दशकात नवीन कंपन्या काढल्या. सिकॅमोर नेटवर्क्स मुळे त्यांचे खूपच नाव झाले . पुढे प्रथितयश आणि पैसा यामुळे त्यांनी स्वतः नवीन उद्योग सुरू करण्या ऐवजी नवीन उमद्यांना तयार करायला सुरुवात केली. त्याच सुमारास त्यांन मॅसॅच्यूसेटस ईन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळात नेमले गेले. तेथे त्यांनी उद्यमशीलता वाढवण्यासाठी म्हणून मोठी देणगी देऊन देशपांडे रिसर्च सेंटर स्थापले. पुढे सामाजिक उद्यमशीलतेबद्द्ल जसजसे समजू लागले तसे त्यांना वाटले की भारतात या संदर्भात काहीतरी केले पाहीजे. म्हणून देशपांडे फाउंडेशनमार्फत त्यांच्या हुबळी या गावापाशी[३] एक भाग नक्की करून तेथे सामाजिक उद्यमशीलतेने चालू केलेल्या स्वयंसेवी संस्था तयार करण्याला, त्यांना "टेस्ट बेड" (अथवा सॅंडबॉक्स) आणि अनुदान दिले. फक्त फरक असा की या संस्थांनी विना नफा तत्त्वावर असले तरी एखाद्या "प्रोफेशनल बिझिनेस" प्रमाणे स्वतःचे काम चालवायचे - त्यातून पैसा, उद्योग, काहीतरी खूप समाजोपयोगी असे कमाल/किमान यश मिळवायचेच. त्यातूनच अक्षयपात्र फाउंडेशनची स्थापना इ.स.२००० मध्ये झाली.[४]
शाळेत मधल्या वेळचे खाणे/आहार मुलांना फुकट मिळाला पाहीजे अशी सरकारी योजना भारतात आहे. पण सरकारला ते करणे जमत नव्हते.[५] अक्षयपात्र या संस्थेने तो भाग सहजसाध्य केला पण व्यवस्थापन तयार करून. त्यातून आज जवळ १२ लाख मुलांना जेवण मिळण्याची सोय झाली आणि हा प्रकल्प आणि त्याचे धंद्याचे गणित हे यशस्वी ठरल्यामुळे तो इतरत्र पण राबवला जाण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. युएस काँग्रेसला ह्या प्रकल्पाची माहिती समजल्याने त्यांनी काही प्रतिनिधी ते पहायला पाठवले होते.[६]