अ व्हॅलेंटाईन्स डे[१] हा रोहितराव नरसिंगे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे[२].फैरोज माजगांवकर यांनी मि. जोकर एंटरटेनमेंट या बॅनर अंतर्गत अ व्हॅलेंटाईन्स डे या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला एलेन केपी यांनी संगीत दिले असून यामध्ये फैरोज माजगांवकर, अरुण कदम, संजय खापरे, अभिजित चव्हाण, चैताली चव्हाण या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. २१ जून २०२४ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.[३]