अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनांमुळे महाराष्ट्रातील दलित रंगभूमीला सार्वत्रिकतेचे, चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. तिची सुरुवात १९८४ मध्ये पुण्यातून झाली. पुढे विविध ठिकाणी अखिल भारतीय नाट्य संमेलने भरवण्यात आली. ही संमेलने किमान दहा वेळा भरली असावीत. यातील संमेलनाच्या पाच अध्यक्षांच्या भाषणांचे त्र्यंबक महाजन यांनी संपादित केलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे[१]. या पहिल्या दहा नाट्य संमेलनांचा उल्लेख भि. शि. शिंदे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात आहे [२]. सदर समेलनांची थोडक्यात खाली आली आहे.
या संमेलनात (२४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी १९८४) एकूण वीस लहानमोठ्या नाटकांचे वेगवेगळ्या भागांतून आलेल्या नाट्यसंचांनी प्रयोग सादर केले आणि सात परिसंवाद घेण्यात आले.
दुसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अहमदनगर, १९८५
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ भीमशाहीर मा. भीमराव कर्डक यांच्या आणि संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवसांच्या या संमेलनात एकूण सहा परिसंवाद आणि बावीस नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले. आंबेडकरी जाणिवेतून लिहिलेल्या आणि सादर केलेल्या दलितेतर नाट्यसंचांचे प्रयोग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
तिसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबाजोगाई, जि. बीड १९८६
उद्घाटक : राजेंद्रकुमारी वाजपेयी (केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री, भारत सरकार).
स्वागताध्यक्ष : खासदार सौ. केशरकाकू क्षीरसागर
प्रमुख पाहुणे : रजनीताई सातव (आरोग्य व समाजकल्याण राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)
या संमेलनात तीन परिसंवाद व पंचवीस छोटी-मोठी नाटके झाली. संमेलनाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार व परिवहन मंत्री विलासराव देशमुख आणि सार्वजनिक बांधकाम, सांस्कृतिक कार्य युवाकल्याण, क्रीडा, पर्यटन राज्यमंत्री अशोक पाटील, हे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती प्रा. दत्ता भगत, भि.शि. शिदे, मधुसूदन गायकवाड, प्रा. यशवंत मनोहर, प्रा. अविनाश डोळस, वामन निंबाळकर, राम जाधव. या संमेलनात तीन परिसंवाद आणि आठ छोट्या-मोठ्या नाटकांचे प्रयोग झाले. कर्नाटक व आंध्र प्रदेशातील दलित नाट्य संचाचे नाट्य प्रयोग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
संमेलनाचा समारोप खासदार एन.के.पी. साळवे, खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
पाचवे अ.भा. दलित नाट्य संमेलन, नांदेड, १९९०
संमेलनध्यक्ष : प्रा. अविनाश डोळस
स्वागताध्यक्ष : डॉ. यशवंत मनोहर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
उद्घाटक : डॉ. भालचंद्र फडके, ज्येष्ठ दलित साहित्य समीक्षक व विचारवंत.
पाचव्या संमेलनात चार परिसंवाद आणि वीस छोट्या-मोठ्या नाटकांचे प्रयोग झाले.
या संमेलनात तीन परिसंवाद आणि सोळा नाटकांचे सादरीकरण झाले; निबंध वाचन आणि पथनाट्याचे प्रयोग झाले.
संमेलनाचा समारोप महाराष्ट् राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते पार पडला.