अ-जीवनसत्त्व

Chemical structure of retinol, one of the major forms of vitamin A
अ-जीवनसत्त्व

अ-जीवनसत्त्व हे शरिराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळत नाही, पण मेदात विरघळते. अ-जीवनसत्त्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते.

पोषण

अ-जीवनसत्त्वामुळे द्ष्टी चांगली राहते, हाडांची वाढ होते आणि फुफ्फुसे व रक्त यांचे पोषण होते. या जीवनसत्त्वामुळे शरीराचे जंतुसंसर्गापासून संरक्षण होते.

कमतरतेचे दुष्परिणाम

अ-जीवनसत्त्वाची कमतरता दोन प्रकारे होते. -

१. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. मातेचे दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळेही डोळ्यावर असाच परिणाम होतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही.

२. मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्त्व शरीरात जात नाही व त्यामुळे शरिरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.

अ-जीवनसत्त्वाची रोजच्या आहारातील आवश्यक पातळी- ७००-९०० मायक्रोग्रॅम

अ-जीवनसत्त्व हे गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक वगैरेंत असते.


संदर्भ

हे ही पहा

  1. ब-जीवनसत्त्व
  2. क-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. ई-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!