हा लेख अफगाणिस्तानचा हेरात प्रांत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, हेरात.
हेरात प्रांत (दारी/पश्तो:هرات) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या पश्चिम सीमेवर असलेल्या या प्रांतात १७ जिल्हे असून येथील लोकसंख्या २१,८७,१६९ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र हेरात आहे.
अर्थव्यवस्था
अफगाणिस्तानमध्ये उगवणाऱ्या केशराचा ९०% भाग हेरात प्रांतात होतो. २०१४मध्ये येथील केशराचे उत्पादन अंदाजे १ कोटी २० लाख अमेरिकन डॉलर (८ अब्ज ५० लाख रुपये) होते.[२]